30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराष्ट्रीय'या' 48 हजार कोटींचे वाली कोण? 'आरबीआय'कडून शोध सुरू

‘या’ 48 हजार कोटींचे वाली कोण? ‘आरबीआय’कडून शोध सुरू

टीम लय भारी 

दिल्ली : आरबीआयकडून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय बॅंकांमध्ये दावा न केलेल्या रकमेत वाढ झाली असून ही रक्कम तब्बल 48,262 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे, त्यामुळे आता या बेकायदेशीर रकमेचे दावेदार कोण हे शोधण्यासाठी आरबीआयने मोहीम हाती घेतली आहे. बॅंकेच्या वार्षिक अहवालानुसार 2021-22 या आर्थिक वर्षात बँकांमधील दावा न केलेली रक्कम 48,262 कोटी रुपयांपर्यंत वाढली असून मागील आर्थिक वर्षात ही रक्कम 39,264 कोटी रुपये होती.

जर एखाद्या ग्राहकाने त्याच्या खात्यात साधारणपणे 10 वर्षांत कोणताच व्यवहार केला नाही तर त्या खात्यात जमा असलेली रक्कम ‘दावा न केलेली’ अशीच ग्राह्य धरली जाते. शिवाय ज्या खात्यातून व्यवहार झालेलेच नाही ते खाते निष्क्रिय ठरते. दरम्यान दावा न केलेली रक्कम रिझर्व्ह बँकेच्या ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये (DEAF) जमा करण्यात येते. एका अहवालानुसार यातील बहुतांश रक्कम तामिळनाडू, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, बंगाल, कर्नाटक, बिहार आणि तेलंगणा/आंध्र प्रदेशमधील बँकांमध्ये जमा असल्याची धक्कादायक माहिती रिझर्व्ह बँकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितली आहे.

बॅंक अनेकदा ग्राहकांच्या जागरुकतेसाठी अनेक मोहीम राबवतात, याबाबत सुद्धा बॅंकेने वारंवार मोहिम राबवली तरीही दावा नसणाऱ्या रकमेचा आकडा हा वाढताच असल्याचे दिसून आले. या मागचे कारण शोधले असता अनेक कारणे समोर आली त्यापैकी खातेदाराचा मृत्यू, कुटुंबातील सदस्यांना मृत व्यक्तीच्या खात्याबद्दल माहिती नसणे, चुकीचा पत्ता किंवा नॉमिनीची (नामनिर्देशित) खात्यात नोंदणी नसणे अशा कारणांची संख्या जास्त दिसून आली.

जर दावेदार वेळीच पुढे आला नाही तर संबंधित रक्कम ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता खात्यात वळवण्यात येते. खात्यात गेलेली संबंधीत रक्कम पुन्हा मिळवणे शक्य असते, त्यासाठी बॅंकेशी संपर्क करणे गरजेचे आहे. या दावा न केलेल्या खातेदारांची माहिती सहज बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असते. खातेदाराचे पॅनकार्ड, जन्मतारीख, नाव आणि पट्ट्यासह दावा न केलेल्या रक्कम खातेदाराच्या खात्यात पडून आहे की नाही अशी संपूर्ण माहिती वेबसाईटवर उपलब्ध होते.

हे सुद्धा वाचा…

VIDEO : ईडीच्या विरोधात रेल्वे रुळावर उतरले काँग्रेस समर्थक

बाळासाहेबांच्या स्नुषा स्मिता ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

WhatsApp वर दिसणार ‘हे’ पाच नवे मजेदार फिचर्स, वाचा….

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी